Select Language:

Citizen Charter

Citizen Charter

महाराष्ट्र शासन

नागरिकांची सनद

तंत्र शिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई

3, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमांक 1967, मुंबई-400001.

दूरध्वनी क्रमांक : 022-22641150 / 51

22620601 / 22690602, फॅक्स क्रमांक : 022-22690007

नागरिकांची सनद

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच राज्यामध्ये तंत्रशिक्षणाची वाढ करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाची 1948 साली स्थापना झाली. तंत्रशिक्षणाचे धोरण ठरविण्यास शासनास मदत करणे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन शाखा इ. शाखेतील शासकीय संस्था सुरू करण्याचे तसेच अशासकीय संस्थांना मान्यता देऊन मार्गदर्शन व नियंत्रण करण्याचे काम हे संचालनालयाचे असते.

भारताच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी प्रगत तंत्र उद्योग व दर्जेदार तंत्र शिक्षणाची नितांत गरज आहे. पारतंत्रातल्या अविकसित अवस्थेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम विकसनशील स्थिती व आता विकसीत स्थितीकडे झेप घेताना तंत्र उद्योग व तंत्र शिक्षणाने महत्वाची कामगिरी बजावली आहे. प्रगत तंत्र उद्योगाने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या व दर्जेदार तंत्र शिक्षणाने त्यासाठी तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. तंत्र क्षेत्रातील या विकासामुळेच पूर्वी शेतीवरच पूर्ण अवलंबून असलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेस औद्योगिक क्षेत्रात आता नेत्रदीपक टप्पा गाठता आला आहे.

भारताच्या या औद्योगिक विकासात महाराष्ट्र राज्याने मोठा सहभाग दिला आहे. देशात औद्योगिक उत्पादनात राज्याचा वाटा सुमारे 26 ते 28 टक्के असून देशात राज्याचा गुजरात नंतर दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने जशी कारखानदारीत उज्ज्वल कामगिरी केली तसेच तंत्र कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी जाणीवपूर्वक नियोजन केले व त्या अनुषंगाने दर्जेदार तंत्रशिक्षण देण्याबाबत पावले उचलली.

सध्याचे युग हे झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञानाचे युग आहे. यामुळे आजचे तंत्रकौशल्य उद्या कालबाह्य होत आहे. या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अभ्यासक्रमात सातत्याने बदल करणे अपरिहार्य झाले आहे. त्या अनुषंगाने स्वायत्त तंत्रनिकेतने तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्याचे धोरण तंत्र शिक्षण संचालनालयाने अंगीकारले आहे. येत्या दशका-दोन दशकात होणाऱ्या सर्व तंत्रज्ञान विषयक बदलांना समर्थपणे समोरे जाण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने धोरणात्मक कार्य नियोजन केले आहे. महाराष्ट्राची तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी टिकून राहण्यासाठी व अधिकाधिक प्रगती होण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आपला सिंहाचा वाटा उचलत आहे.

तंत्रशिक्षण विभागाची रचना :-

तंत्र शिक्षण संचालनालय हे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या नियंत्रणाखाली आहे.

महाराष्ट्र राज्यात पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेणे, तसेच अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी बदल करणे इत्यादी बाबी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत हाताळण्यांत येतात. तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक मंडळाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे 4 विभागीय कार्यालये आहेत, याबाबतची अधिक माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे msbte.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली एकत्रितपणे काम पार पाडण्यासाठी खाली नमूद 6 विभागीय कार्यालये कार्यरत आहेत.

अ.

क्र.

विभागीय कार्यालयाचे नांव व पत्ता

दूरध्वनी क्रमांक, संकेत स्थळ व ई-मेल

विभागीय कार्यालयांतर्गत येणारे जिल्हे

1.

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, जागतिक बँक प्रकल्प इमारत, शासकीय तंत्रनिकेतन परीसर, 49, अलि यावर जंग मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051.

022-26474892, 26471619

www.jdteromumbai.com

romumbai@dtemaharashtra.gov.in

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर

2.

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, 412-ई, बहिरट पाटील चौक, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे-411016.

020-25656234, 25678973

www.ropune.org.in

ropune@dtemaharashtra.gov.in

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

3.

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, पत्र पेटी क्रमांक 217, सामनगांव रोड, नाशिक रोड, नाशिक-422101

0253-2461479,
2460114

www.dtensk.org

ronashik@dtemaharashtra.gov.in

नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदूरबार

4.

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, पत्र पेटी क्रमांक 119, उस्मानपुरा, स्टेशन रोड, औरंगाबाद-431005.

0240-2334216,
2334769

www.dteau.org

roaurangabad@dtemaharashtra.gov.in

औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड

5.

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, नवीन कॉटन मार्केट रोड, सहकारनगर,

अमरावती-444603.

0721-2573027

www.jdroamt.org

roamaravati@dtemaharashtra.gov.in

अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ

6.

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, सदर बाजार, नागपूर-440001.

0712-2565143,
2549387

www.rdtenagpur.org.in

ronagpur@dtemaharashtra.gov.in

नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा

संचालनालयाच्या अधिपत्याखाली खालीलप्रमाणे पदे मंजूर आहेत.

गट-अ (शिक्षक व शिक्षकेतर)

3923

गट-ब

97

गट-क

2960

गट-ड

1802

तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खालीलप्रमाणे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी व तत्सम पदविका व पदवी संस्था तसेच एम.बी.ए., एम.सी.ए. या पदव्युत्तर पदवी संस्था कार्यरत आहेत. (शैक्षणिक वर्ष 2018-19)

अभ्यासक्रम

शासकीय

अशासकीय अनुदानित

विना अनुदानित

एकूण

अभियांत्रिकी (पदविका )

42

17

414

473

अभियांत्रिकी (पदवी )

8

11

346

365

अभियांत्रिकी (पदव्युत्तर पदवी )

6

12

208

226

औषधनिर्माणशास्त्र (पदविका )

4

20

213

237

औषधनिर्माणशास्त्र (पदवी )

4

6

158

168

औषधनिर्माणशास्त्र (पदव्युत्तर पदवी )

3

6

108

117

फार्म डी.

2

0

3

5

वास्तुशास्त्र (पदवी )

0

3

72

75

वास्तुशास्त्र (पदव्युत्तर पदवी )

0

0

16

16

एच.एम.सी.टी (पदविका )

2

0

2

4

एच.एम.सी.टी (पदवी )

0

1

8

9

एच.एम.सी.टी (पदव्युत्तर पदवी )

0

0

2

2

एम.बी.ए.

2

13

330

345

पी.जी.डी.बी.एम.

1

0

0

1

एम.सी.ए.

2

9

104

115

एकूण

76

98

1984

2158

नियम/ प्रवेश प्रक्रिया :-

या संचालनालयाशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थामधील प्रवेशाचे नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

प्रवेश नियमावली पुस्तक स्वरुपात विशिष्ठ रकमेस विहीत वितरण केंद्रावर उपलब्ध आहेत व त्याबाबतच्या अधिसूचना वेळोवेळी प्रसिध्द केल्या जातात.

नागरिकांच्यासनदेची अंमलबजावणी :-

तंत्र शिक्षण संचालनालय नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटिबध्द आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्य भावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरविताना नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी संचालनालयातील प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याची राहील.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा :-

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाबाबत कार्यवाही पार पाडली जाते. संचालनालयामार्फत नागरिकांना खालील सेवा पुरविल्या जातात.

अ.

क्र.

सेवांचातपशिल

सेवापुरविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

सेवापुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा

सेवापुरविण्याची विहित मुदत

सेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा

1

2

3

4

5

6

1.

पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्क परताव्याबाबत कार्यवाही

प्रवेश घेऊन तो रद्द केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह केलेला अर्ज

श्री. प्रमोद नाईक, सहसंचालक,

 

श्री. एस.बी. शिरभाते, सहाय्यक संचालक (तां)

अर्ज आल्यानंतर सुमारे 1 महिन्यात

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

अ.

क्र.

सेवांचातपशिल

सेवापुरविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

सेवापुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा

सेवापुरविण्याची विहित मुदत

सेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा

1

2

3

4

5

6

3.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे अंतर्गत पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था तसेच सुरु असलेल्या संस्थांना नवीन पदविका अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता वाढ / घट बाबतच्या प्रस्तावास परिषदेच्या मान्यतेकरीता संचालनालयामार्फत शिफारशी सादर करणे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने संबंधित शैक्षणिक वर्षाकरीता प्रसिध्द केलेल्या ॲप्रुव्हल प्रोसेस हँडबुकमध्ये नमूद केलेली कागदपत्रे

डॉ. सुभाष महाजन,

सहसंचालक

श्री. व्ही.जी. तांबे, सहाय्यक संचालक (तां.)

प्रस्ताव सादर करण्यासाठी परिषदेने विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर 15 दिवस

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

4.

उपरोक्त संस्थांच्या बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेमार्फत मान्यता मिळाल्यानंतर व निर्गमित शासन निर्णयातील अटींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही.

शासन निर्णयात नमूद अटींच्या अनुषंगाने कागदपत्रे

शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 1 महिन्यांच्या आत

5.

शासकीय / शासकीय अनुदानित तंत्रनिकेतनात पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था स्थलांतराबाबतचे कामकाज.

संबंधित शैक्षणिक वर्षातील प्रवेश नियमावलीतील तरतूदीनुसार

संस्था स्थलांतराबाबतचा निर्णय थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्य जागा वाटप जाहिर करण्याच्या तीन दिवस पूर्वीच्या दिनांकापर्यंत

अ.

क्र.

सेवांचातपशिल

सेवापुरविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

सेवापुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा

सेवापुरविण्याची विहित मुदत

सेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा

1

2

3

4

5

6

6.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेअंतर्गत पदवी / पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था तसेच अस्तित्वातील संस्थांना नवीन अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता वाढ / घट  बाबतच्या प्रस्तावास परिषदेच्या मान्यतेकरिता संचालनालयामार्फत शासनास शिफारशी सादर करणे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संबंधित शैक्षणिक वर्षाकरिता प्रसिध्द केलेल्या ॲप्रुअल प्रोसेस हॅण्डबुकमध्ये नमूद केलेली कागदपत्रे

श्री. प्रमोद नाईक, सहसंचालक

 

श्री. एस.बी. शिरभाते, सहाय्यक संचालक (तां)

प्रस्ताव सादर करण्यासाठी परिषदेने विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर 15 दिवस

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

7.

उपरोक्त संस्थांच्या बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत मान्यता मिळाल्यानंतर व निर्गमित शासन निर्णयातील अटींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही

शासन निर्णयात नमूद अटींच्या अनुषंगाने कागदपत्रे

शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत

8.

केंद्रशासन पुरस्कृत योजना

अ) गुणवत्ता-नि-साधन आधारित शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्राचा अधिवास (Domicile) असलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (नवीन व नुतनीकरण) ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या प्रिंटसोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

1. विद्यार्थ्यांची स्वत:ची स्वाक्षरी असलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (फोटो)

2. शालांत परीक्षा पासूनच्या परीक्षांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती.

3. अर्जदाराच्या पालकाचे / कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.

4. कायमस्वरुपी पत्त्याबाबतचा पुरावा तसेच या योजनेच्या अधिक माहितीकरीता केंद्र शासनाचे संकेतस्थळ :

National Scholarship portal च्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती प्राप्त करुन घेता येईल.

श्री. व्ही.जी. तांबे,

सहाय्यक संचालक (तां)

श्री. सुंदर बुलानी,

विशेष कार्य अधिकारी

केंद्र शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

9.

केंद्रशासन पुरस्कृत योजना

ब) फ्री कोचिंग अँड अलाइड स्कीम

केंद्र शासनाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासनाची मोफत प्रशिक्षण योजना 2007-08 पासून सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुस्लिम, शीख, बौध्द, ख्रिश्चन, पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यांत आलेली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी संस्थांना 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत प्रस्ताव जमा करण्यासाठीची जाहिरात दरवर्षी केंद्र शासनाकडून देण्यात येते. सदर योजनेसाठी संस्थेनी सादर केलेल्या प्रस्तावाची संचालनालयाच्या विभागीय कार्यालयांमार्फत तपासणी केली जाते. संचालनालयाकडून संपूर्ण तपासणी अहवाल संस्थेच्या प्रस्तावासोबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनास पाठविण्यात येतो. केंद्र शासनाकडून प्रस्ताव (अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांची संख्या) मंजूर झाल्यानंतर मंजूर अनुदानाच्या 50 टक्के (पहिला हप्ता) केंद्र शासनाकडून पत्रासह थेट संस्थांना देण्यात येते. संस्थांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर या योजनेच्या अटी व शर्तीनुसार

 1. विद्यार्थी अल्प संख्यांक समुदायाचे असावे.

 2. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखांपेक्षा कमी असावे.

3. पूर्वी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांने कोणताही फायदा घेतलेला नसावा.

4. 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव इ. संस्थांना जाहिरात देऊन केंद्र शासनाकडून मंजूर अभ्यासक्रमासाठी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकडून अर्ज स्विकारून व अटी व शर्तींनुसार निवड करून मोफत प्रशिक्षण द्यावे लागते. तसेच या योजनेच्या अधिक माहितीकरीता केंद्र शासनाच्या संकेतस्थळ : www.minorityaffairs.gov.in याव्दारे माहिती प्राप्त करुन घेता येईल.

श्री. व्ही.जी. तांबे,

सहाय्यक संचालक (तां)

श्री. सुंदर बुलानी,

विशेष कार्य अधिकारी

केंद्र शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

10.

राज्यशासन पुरस्कृत योजना

अ) उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना

 

महाराष्ट्राचा अधिवास (डोमिसाईल) असलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.(नविन व नूतनीकरण) ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या प्रिंट सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.

1. पासपोर्ट साईझ फोटोसह स्वाक्षरी असलेल्या अर्जाची स्कॅन कॉपी.

2. सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती (शालांत परीक्षेपासूनच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती)

3. अर्जदाराच्या पालकाचे / कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.

4. कायमस्वरूपी पत्याबाबतचा पुरावा (डोमिसाईल प्रमाणपत्र / आधारकार्ड नंबर / निवडणूक ओळसखपत्र)

5. विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द केलेला धनादेश (चेक)

6. नविन / नूतनीकरणाच्या अर्जात विद्यार्थ्यांचा स्व्त:चा आधारकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे.

तसेच या योजनेच्या अधिक माहितीकरीता

संकेत स्थळ :www.dtemaharashtra.gov.in /scholarships याव्दारे माहिती प्राप्त करून घेता येईल.

श्री. व्ही.जी. तांबे,

सहाय्यक संचालक (तां)

श्री. सुंदर बुलानी,

विशेष कार्य अधिकारी

राज्य शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

11.

राज्यशासन पुरस्कृत योजना

ब) रोजगाराभिमुख प्रशिक्षण फी प्रतिपूर्ती योजना

 

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी ऑन लाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

फोटोसहित ऑनलाई भरलेल्या अर्जाच्या प्रिंट सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

1. विद्यार्थ्यांचे स्वत:च्या किंवा विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत (संयुक्त बँक खात्याबाबत विद्यार्थ्यांचे नाव बँक खात्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असणे आवश्यक आहे)

2. शालांत परीक्षेमध्ये अर्जित केलेले गुण दर्शविणा-या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत

3. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा. उदा. वीज देयक, दूरध्वनी देयक, पारपत्र, निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एकाची स्वाक्षरी केलेली साक्षांकित प्रत

4. स्वयंरोजगार असलेल्या पालकांच्या बाबतीत स्वयंघोषित उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र (वेबसाईटवर दिलेल्या विवरणपत्रानुसार) / नोकरी करणा-या पालकांच्या बाबतीत त्यांच्या नियोक्त्याकडून प्राप्त केलेल्या त्या वर्षीच्या उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत.

5. विद्यार्थ्याने ज्या वर्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाच्या भरलेल्या प्रवेश शुल्क पावतीची साक्षांकित प्रत व विद्यार्थ्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाच्या त्या वर्षीच्या उत्तीर्ण / अनुत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत.

6. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची फी प्रतिपुर्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात देण्यांत येईल व त्यासाठी संस्थांनी विद्यार्थ्यांचे बिनचूक खाते क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये भरावा. अर्जात भरलेला बॅक खाते क्रमांक चुकीचा निघाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था प्रमुखाची राहील. तसेच योजनेच्या अधिक माहितीकरीता संकेतस्थळ :

www.dtemaharashtra.gov.in/EOTP याद्वारे माहिती प्राप्त करुन घेता येईल.

श्री. व्ही.जी. तांबे,

सहाय्यक संचालक (तां)

श्री. सुंदर बुलानी,

विशेष कार्य अधिकारी

राज्य शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात

डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण, मुंबई.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत हाताळले जाणारे विषय, संबंधित जन माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी व संबंधित कार्यासने :-

अ.क्र.

विभागातील महत्वाचे विषय

कार्यासन क्रमांक

दूरध्वनी क्रमांक

जन माहिती अधिकारी

अपिलीय अधिकारी

1.

गोपनीय कक्ष

1

30233421

सहाय्यक संचालक (तां)

सहसंचालक

2.

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांना मान्यता व विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधील आस्थापना विषयक बाबी

2

30233402

सहाय्यक संचालक (तां)

सहसंचालक

3.

पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश व गुणवत्ता यादीस मान्यता देणे

2 अ

30233422

सहाय्यक संचालक (तां)

सहसंचालक

4.

माहिती तंत्रज्ञान विकास केंद्र

3

30233403

प्रणाली विश्लेषक

सहसंचालक

5.

शासकीय व अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधील शिक्षकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आस्थापना व प्रशासन विषयक बाबी

4

30233404

सहाय्यक संचालक (तां)

सहसंचालक

6.

शासकीय व अशासकीय अनुदानित पदविका संस्थांमधील शिक्षकीय अधिकाऱ्यांचे आस्थापना व प्रशासन विषयक बाबी

4 अ

30233424

सहाय्यक संचालक (अतां.)

सहसंचालक

7.

शासकीय संस्थांमधील सेवा निवृत्ती प्रकरणे, वेतननिश्चिती व इतर प्रशासकीय बाबी

5

30233405

प्रशासकीय अधिकारी

सहसंचालक

8.

लेखा विभाग-देयके पारीत करण्याबाबतच्या सर्व बाबी

6

30233406

लेखा अधिकारी

सहाय्यक संचालक (तां.)

9.

अशासकीय अनुदानित संस्थांना अनुदान विषयक बाबी हाताळणे

7

30233407

प्रशासकीय अधिकारी

सहाय्यक संचालक (तां.)

10.

अशासकीय अनुदानित संस्थांतील सेवा निवृत्ती प्रकरणे, वैद्यकीय देयके

8

30233408

प्रशासकीय अधिकारी (लेखा)

सहाय्यक संचालक (तां.)

11.

वार्षिक योजनांतर्गत नियोजनाच्या बाबी

9

30233409

नियोजन अधिकारी

उपसंचालक

12.

पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांना मान्यता, प्रवेश व विना अनुदानित पदविका संस्थांमधील आस्थापना विषयक बाबी

10

30233410

सहाय्यक संचालक (तां.)

सहसंचालक

13.

सर्व प्रकारच्या खरेदी व प्रशिक्षणविषयक बाबी

11

30233411

निरीक्षक

सहसंचालक

14.

मुख्य कार्यालयातील गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या आस्थपना व प्रशासकीय बाबी

12

30233412

रचना व कार्यपध्दती अधिकारी

सहसंचालक

15.

नोंदणी शाखा व जुने अभिलेख जतन करणे

13

30233413

रचना व कार्यपध्दती अधिकारी

सहाय्यक संचालक (तां.)

16.

भांडार पडताळणी व लेखा आक्षेपबाबत कार्यवाही

14

30233414

मुख्य लेखा व भांडार पडताळणी अधिकारी

उपसंचालक

17.

योजनेत्तर अर्थसंकल्प, विना अनुदानित संस्थांच्या इ.बी.सी. सवलती विषयक बाबी व शासकीय संस्थांचे अनुदान वाटप

15

30233415

सहाय्यक संचालक (अतां.)

सहसंचालक

18.

संचालनालयातील सर्व संकीर्ण कामकाज व स्टेशनरी देणे. संचालनालय व अधिनस्त सर्व कार्यालये / संस्थातील वर्ग 1 ते 4 मधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सर्व प्रकारचे अग्रिम मंजूर करणे.

 

 

16

30233416

सहाय्यक संचालक (अतां.)

सहसंचालक

19.

टि.ई.क्यु.आय.पी.

17

30233419

उपसंचालक

सहसंचालक

20.

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

18

30233486

विशेष कार्य अधिकारी

सहसंचालक

21.

क्वालिटी मॅनेजमेंट सेल

19

30233493

सहाय्यक संचालक (तां)

उपसंचालक